आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीने गावाकडे जाणाऱ्या तरुणाला काळाने गाठलेेे; दिवाळीसाठी पुण्याहून निघाला होता गावाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज- दुचाकीवर समोरून धडकलेली कार हातावरून गेल्याने तरुणाचा उजवा हात निकामी झाला. हा अपघात रविवारी सकाळी ११ वाजता केज - अंबाजोगाई मार्गावरील होळ येथील होळेश्वर विद्यालयाजवळ घडली. यात कारचालकही जखमी झाला आहे.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील येथील व्यंकटी वामनराव गव्हाणे हा तरुण रविवारी सकाळी ११ वाजता दुचाकीवरून (एमएच २४ डी ६९०९) केजकडे निघाला होता. होळजवळ केजहून अंबाजोगाईकडे निघालेल्या कारने (एमएच १९ सी ६९९३) दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातात व्यंकटी गव्हाणे या तरुणाच्या हातावरून कार गेल्याने त्याचा उजवा हात निकामी झाला.

या अपघातात कारचालक रघुनाथ तुकाराम शिंदे हे गंभीर जखमी झाले असून त्याला तातडीने अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी विजय केद्रें यांनी मदत केली. दोन्ही जखमींच्या नातेवाइकांना अपघाताची माहिती देण्यात आली असून युसूफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
खेर्डावाडी गावावर पसरली शोककळा
गेवराई- दिवाळीसाठी पुण्याहून दुचाकीवर गावाकडे निघालेल्या ज्ञानेश्वर माने या तरुणाला अर्धमसला फाटा येथे अज्ञात वाहनाने शनिवारी सायंकाळी धडक दिली. गेवराईहून औरंगाबादला उपचारासाठी जातानाच तरुणाचा वाटेत मृत्यू झाला.

तालुक्यातील खेर्डावाडी येथील ज्ञानेश्वर रामदास माने (३०) हा युवक पत्नी आणि दोन मुलांसह पुण्यात राहत असून शनिवारी सकाळी दिवाळीसाठी पत्नी आणि दोन मुलांना बसमध्ये बसवून तो दुचाकीवरून (एमएच १४ एफयू ९९२६) गावाकडे निघाला. गढी-माजलगाव रस्त्यावरील अर्धमसला फाट्यावर शनिवारी सायंकाळी पाच वाजता ज्ञानेश्वरच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाला.

त्याला गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तब्येत खाल्यावल्याने औरंगाबादला हलविण्यात आले. वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत माने कुटुंबीयांवर हा प्रसंग ओढावला.

गावराहिले होते किमी :
ज्ञानेश्वर मानेचा अर्धमसला फाट्याजवळ अपघात झाला. या फाट्यापासून ज्ञानेश्वरचे खेर्डावाडी हे गाव केवळ दोन ते अडीच किलोमीटर राहिले होते. सर्वांची एकत्र दिवाळी साजरी होणार या आनंदात असलेल्या माने कुटुंबीयांवर या घटनेने आघात झाला आहे.
त्यावाहनाचा शोध सुरू
ज्ञानेश्वरमानेला धडक दिलेले वाहन एका व्यक्तीने पाहिले असून त्याच्या वर्णनाप्रमाणे चौकशी करून वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस जमादार ओमप्रकाश आदमाने यांनी सांगितले.
केज अंबाजोगाई मार्गावरील होळजवळ भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीचे नुकसान झाले.
बातम्या आणखी आहेत...