आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंटेनर-दुचाकी अपघातात सिल्लोडजवळ एक ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - रस्ता ओलांडणार्‍या दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या वाहनांवर कंटेनर जाऊन धडकल्याने वाहनांचे नुकसान झाले. कडुबाई पवार असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव आहे.

सिल्लोड-अजिंठा रस्त्यावरील लिहाखेडी फाट्यावर बुधवार, फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता हा अपघात झाला. वडाळा येथील पंढरी किसन मानकर (४०) हा आई पुतळाबाई (७०) बहीण कडुबाई कौतिक पवार (रा. तलवाडा, ता. सिल्लोड) यांना घेऊन दुचाकीने (एमएच २० सीक्यू ४०९७) सारोळ्याकडे निघाला होता. सिल्लोड -अजिंठा महामार्गावर लिहाखेडी फाट्यावरून सारोळा गावाकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडताना अजिंठ्याकडून सिल्लोडकडे भरधाव येणार्‍या कंटेनरने (एचआर ५५ पीओ ३२३) दुचाकीला जोरदार धडक दिली. यात कडुबाई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पंढरी पुतळाबाई गंभीर जखमी झाले.