आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे-सोलापूर राष्ट्रीय मार्गावर पाच वर्षांत गेले 254 बळी !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - शहरातून बार्शी रोड ते जालना रोडमार्गे धुळे-सोलापूर 211 राष्ट्रीय महामार्ग आणि नगर रोड आणि परळी रोड या चारही प्रमुख रस्त्यांवर गेल्या पाच वर्षांमध्ये 254 जण वेगवेगळ्या अपघातांमध्ये ठार झाले आहेत. मंगळवारी सकाळी झालेल्या नम्रता राजकुमार नाकेल या युवतीच्या अपघाती मृत्यूने संख्येत भर पडली आहे.
बीड शहरामधून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बार्शी रोड ते जालना रोड असा जातो, तर नगर रोड आणि परळी रोड शहरात आहेत. या चारही रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणार जड वाहतूक असते. सकाळी सहा ते रात्री साडेदहापर्यंत शहरातील नागरिकांची वाहतूक सुरू असते. शहरामधून जाणार्‍या धुळे-सोलापूर या 211 राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहनांमुळे शहरातील वाहतूक करणार्‍या नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. गेल्या पाच वर्षांतील अपघातांची आडकडेवारी थक्क करणारी आहे. अपघाताची ही मालिका कधी थांबणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत बाह्यवळण रस्ता किंवा उड्डानपूल होत नाही, तोपर्यंत सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत जड वाहतूक बंद करावी नसता कायमस्वरूपी जड वाहतूक बंद करावी, अशा प्रतिक्रिया विद्यार्थी, प्राध्यापकांनी व्यक्त केल्या.
आई, मी परत येते गं! - सकाळी घरातून जाताना नम्रताने चहा घेतला नाही आणि आई मी परत येते गं, असे म्हणून ती महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली. वीस मिनिटांतच नम्रताचा अपघात झाल्याची माहिती समजली. ती परत येते म्हणून कायमचीच गेली, असे म्हणत घटनास्थळी नम्रताच्या आईने हंबरडा फोडला.
वळण रस्ता नाही हे दुर्दैव - राज्याचे बांधकाम मंत्री (उपक्रम) जयदत्त क्षीरसागर बीडचे पालकमंत्री आहेत हे सुदैव आहे; परंतु शहरास वळण रस्ता तयार होत नसल्याने हे दुर्दैव आहे. रस्ते अपघातात आता आणखी किती जणांचे बळी जाणार? असा प्रo्न ओबीसी परिषदेचे हनुमंत उपरे यांनी केला.
महाविद्यालयात र्शद्धांजली - नम्रताच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात शोकसभा घेऊन र्शद्धांजली अर्पण करण्यात आली. नम्रताच्या निधनामुळे कॉलेजला सुटी देऊन दुखवटा पाळला.
बायपासचा प्रश्न मोठा - मंगळवारचा अपघात दुर्दैवी घटना आहे. बीड शहरातील नागरिकांसाठी महामार्गामुळे बायपास रस्त्याची अत्यंत गरज आहे. याबाबत प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी तत्काळ विचार करावा नसता नागरिकांच्या आंदोलनात व्यापारीदेखील सहभागी होतील.’’ - सत्यनारायण लाहोटी, माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस
महामार्ग सुरक्षित हवा - शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग मृत्युदूत झाला आहे. डांबरीकरण झाल्याने वाहने अनियंत्रित वेगाने जात आहेत. शाळा, महाविद्यालये लक्षात घेता गतिरोधक त्याचबरोबर जालना रोड ते बार्शी रोडपर्यंत तत्काळ दुभाजकाची गरज आहे.’’- नरेंद्र महाजन, व्यापारी
पोलिस नावालाच अन् काय करणार ! - शहरामध्ये राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघात झाल्यानंतर बर्‍याच वेळाने पोलिस घटनास्थळी पोहोचतात. - सतीश परदेशी, नागरीक