आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन चिमुरड्यांना कारने चिरडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बडनेराकडे जाणार्‍या कारने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दहा जणांना चिरडल्याची घटना शनिवारी घडली. यात दोन बालकांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले.

सुषमा प्रमोद भोसले (4, रा. बडनेरा) आणि ज्ञानेश सलीम भोसले (15 रा, बेलापूर बेडा, घोडगव्हाण) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास बडनेरा स्थानकावर कार्यरत रेल्वेच्या तिकीट कलेक्टरला (टीसी) घेण्यासाठी चालक प्रभाकर राठोड झायलो कारने निघाला होता. या वेळी वळणाच्या बाजूने असलेल्या मैदानात काही पारधी बांधव झोपले होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने त्यांना चिरडले. यात दोन चिमुरडे जागीच ठार झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.