आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दोन जण ठार, दोघे गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गारज - भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन नाशिककडे निघालेल्या भाविकांच्या कारला खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. अपघातात कारमधील चारपैकी दोन जण जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी आठ वाजता नाशिक- औरंगाबाद महामार्गावरील गारजजवळ घडला. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका पावणेदोन तासांनंतर आल्यामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.

नरेंद्र सुमीतलाल कोठारी (४२, रा. गोदावरी हाउसिंग सोसायटी, जेल रोड, नाशिक) व महेश भिकाभाऊ रासकर (३७, रा. सावता चौक, ओझर, नाशिक) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत, तर प्रशांत रमेश शिंदे व विनोद बाळासाहेब जंगम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिऊर बंगला येथे प्राथमिक उपचार करून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. चौघे मित्र भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन फोर्ड कारने (एमएच ०४ डीडब्ल्यू २४३४) खुलताबादहून नाशिककडे निघाले होते.

गारजजवळ समोरून येणारी ट्रक (जीजे १८ एयू ९२१५) खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात कारवर धडकली. अपघात एवढा भीषण होता की कारचा चुराडा झाला. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उशिराने आल्याने महामार्गावर पावणेदाेन तास वाहतूक ठप्प झाली होती.