आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मोटारसायकलींच्या धडकेत दोघे ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर - दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तुळजापूर-औसा रस्त्यावर क ाक्रंबा गावानजीक माउली मंदिराजवळ शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. औसा तालुक्यातील शेंदाळवाडी येथील लक्ष्मण कोंडिबा भोळे (36) हे मोटारसायकलवरून (एमएच 13 बी एफ 2762) तुळजापूरहून गावाकडे जात होते. यादरम्यान वडगाव (लाख) येथील पिंटू ऊर्फ प्रशांत क्षीरसागर (32)आणि विलास महाकांत करंडे हे दोघे मोटारसायकलवरून (एमएच 44 एफ 7375) तुळजापूरकडे येत होते. दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यात लक्ष्मण भोळे आणि पिंटू ऊर्फ प्रशांत क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. तर विलास करंडे याला जखमी अवस्थेत सोलापूरला नेण्यात आले. या घटनेची तुळजापूर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.