आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काळीपिवळीच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - वडोदबाजार फाट्याजवळ काळीपिवळी जीप व दुचाकीत समोरासमोर धडक झाली. यात भोकरदन तालुक्यातील वाडी (बु.) येथील दोन तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील वडोदबाजार फाट्याजवळ काळीपिवळी जीप ( एमएच 20 एए 4816) औरंगाबादकडे जात होती, तर औरंगाबादहून सिल्लोडकडे दुचाकी ( एमएच 20 एएन 9072) येत होती. या दोन्ही वाहनांत वडोदबाजार फाट्याच्या कमानीजवळ मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास समोरासमोर जोराची धडक झाली. यात दुचाकीवरील भोकरदन तालुक्यातील वाडी बु. येथील रहिवासी राजू आत्माराम चोरमारे (21) व विष्णू चोरमारे (25) हे दोघे गंभीर जखमी झाले.

या जखमींना वडोदबाजार पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल एस. के. दौड व पोलिस नाईक टी.एन. खिस्ती यांनी उपचार्थ घाटीत दाखल केले. त्या वेळी डॉक्टरांनी या दोघांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.