आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीर्थपुरी परिसरात दरोडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीर्थपुरी - सोमवारच्या मध्यरात्री दरोडेखोरांनी तीर्थपुरी परिसरातील थडगाच्या मळा कॉलनीत जिल्हा बँकेचे निवृत्त शाखा व्यवस्थापक दत्तात्रय जैतमल यांना चाकूचा धाक दाखवून पन्नास हजारांचा ऐवज लुटून नेला. दरम्यान, तीन दिवसांच्या फरकाने तीर्थपुरीत दुसरा दरोडा पडल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे.

दरोडेखोरांनी सोमवारी मध्यरात्री जैतमल यांच्या घरात भाडेकरू असलेल्या जायकवाडी डाव्या कालव्याच्या कालवा निरीक्षक प्रियंका सोळसकर या बाहेरगावी गेल्याने त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त केले. कपाटातील किमती ऐवज लांबवला. त्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्याच घरातून पोटमाळ्यावरून जैतमल यांच्या घरात प्रवेश केला. तेथे त्यांचा मुलगा संदीप व पत्नीला चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याची पोत, कानातील झुंबर, मंगळसूत्र आणि कपाटातील रोख दहा हजार रुपये असा ५० हजारांचा ऐवज लांबवला. त्यानंतर शहागड रोडवरील भागवत यसलोटे यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. परंतु यसलोटे कुटुंबासह वरच्या मजल्यावर झोपलेले हाेते. तेथे त्यांचा बूट चोरून नेला. त्यानंतर दरोडेखोरांनी याच रस्त्यावरील रामराव मापारे यांच्या घरावर आपला मोर्चा वळवला. दरोडेखोरांनी दगड फेकून मारल्याने मापारे यांच्या पिंडरीचे हाड मोडले. त्यानंतर दरोडेखोरांनी कपाट तोडून ऐवज लांबवला.
बीड शहरात गावठी कट्ट्यासह दोघे अटकेत
बीड | रात्रीच्या वेळी गावठी रिव्हाॅल्व्हर जवळ बाळगून बीड शहरातील तेलगाव नाका चौकात फिरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या झडतीत एक जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले आहे. शहरातील पेठबीड भागातील तेलगाव नाका परिसरात शेख शाहरुख शेख युसूफ (३०) व शेख मुस्तफा शेख इब्राहिम (रा. रविवार पेठ, बीड) हे दोघे गावठी रिव्हाॅल्व्हर बाळगून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळली होती.
बातम्या आणखी आहेत...