आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबाजोगाईत प्राध्यापकाच्या घरावर दरोडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत सव्वा लाखाची लूट केल्याची घटना शहरातील सावतामाळी नगरात रविवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान घडली. कुटुंबीयांना घरात कोंडून दरोडेखोरांनी पोबारा केला. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रा. विनय सदाशिव राजगुरू हे मुळ नवगण राजुरी (ता. बीड) येथील रहिवासी असले तरी ते सध्या अंबाजोगाईच्या खोलेश्वर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीस आहेत. त्यांचे माळीनगर भागात घर आहे. रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी दाराचा कोंडा तोडून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील एकास राजगुरू यांनी पकडले. सोबत असलेल्या दोन साथीदारांनी राजगुरू यांच्या गळ्याला चाकू लावून घरात दागिने, पैसे कुठे ठेवले सांगा नसता जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. या भीतीने सोने, चांदी, मोबाइल व रोख पाच हजार असे एकूण 72 हजार 600 रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला.

दरम्यान, चोरट्यांनी शेजारी राहणार्‍या माणिक लिंबाजी शिंदे यांच्याकडे मोर्चा वळवून त्यांनाही गळ्याला चाकू लावून तुझे दागिने, पैसे कुठे आहेत लवकर काढ नाही तर चाकूने गळा कापू, अशी धमकी देत दरोडेखोरांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सात ग्रॅम मणी व रोख पंचवीस हजार रुपये लंपास केले. या दोन्ही घटनेत एक लाख 16 हजार सहाशे रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरात पोलिसांचा धाक राहिला नसल्याने सध्या चोरांचे फावू लागले आहे, अशा प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत.