आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अष्टविनायक दर्शनाला गेलेल्यांचे घर फोडले, रोख रकमेसह आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी- कुटुंब अष्टविनायक देवदर्शनाला गेल्याची संधी साधून दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण आठ लाख रुपयांचा एेवज लांबवल्याची घटना सोमवारी पहाटे शहरातील सावतामाळीनगर भागात घडली.  

जयराज कमलाकर बारवकर हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. रविवारी ते  पत्नी व मुलीसह अष्टविनायक दर्शनासाठी गेले होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधून  सोमवारी पहाटे चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. देवघरात असणाऱ्या कपाटाची उचकापाचक करून दोन लाख ६७ हजारांची रोख रक्कम व सोन्याचे गंठण, पाटल्या, बांगड्या, मण्यांची माळ, चार अंगठ्या, लॉकेट असे १७ तोळे सोने असा एकूण सात लाख ७७ हजार रुपयांचा एेवज लंपास केला. 

साेमवारी सकाळी  दूध विक्रेता प्रवीण धोंडे यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी बारवरकर यांना माहिती दिली. दुपारी कुटुंबीय आष्टीत आल्यानंतर याप्रकरणी तक्रार देण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...