आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलवार,रिव्‍हॉल्व्हरच्या धाकावर घरात चोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - मध्यरात्री फ्लॅटच्या दुसऱ्या मजल्यावर चढलेल्या चोरांनी व्यापाऱ्याच्या घरात घुसून वीज पुरवठा बंद केला. तलवारीसह रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख एक लाख रुपये असा तीन लाखांचा ऐवज लांबवला. ही घटना बीड शहरातील फुलाईनगर भागात घडली.

बीड शहरातील मोंढा भागातील ऋषभ एजन्सीचे व्यापारी नितीन भागचंद संचेती हे राधागोविंद कृष्णमंदिर परिसरातील फुलाईनगर येथे राहत आहे. रविवारी पहाटे दोन वाजता दोन चोर इमारतीवर चढले व व्यापारी संचेती हे राहत असललेल्या फ्लॅटची वीज खंडित केली. वीज अचानक कशी गेली हे पाहण्यासाठी संचेती यांनी दरवाजा उघडला असता अंधारात दबा धरून बसलेले दोन चोरं दरवाजातून घरात घुसले व संचेती यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ऐवज लांबवला.
बातम्या आणखी आहेत...