आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिव्हॉल्व्हरच्या धाकाने व्यापाऱ्याला लुटले, बीडमधील थरारक घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- घराचेदार उघडे असल्याचे पाहून घुसलेल्या लुटारुंनी व्यापाऱ्याच्या डोक्यालाच सिनेस्टाइल रिव्हॉल्व्हर लावत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा तीन लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. मंगळवारी रात्री पावणेदहा वाजता शहरातील सहयोगनगरातील व्यापारी आनंद कुकडेजा यांच्या घरी ही घटना घडली.

सहयोगनगरातील व्यापारी आनंद विजयकुमार कुकडेजा यांचे सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये एसएसडी एन्टरप्रायजेस नावाचे दुकान असून मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता ते बंद करून घरी आले. पावसामुळे अंधार झाल्याची संधी साधून तोंडाला काळे रुमाल लावून दुचाकीवर आलेल्या चार लुटारुंनी त्यांच्या घरात प्रवेश केला. घरात बसलेले आनंद कुकडेजा यांच्या डोक्याला एकाने रिव्हॉल्व्हर लावून हिंदीतून पैसे सोने काढण्याची धमकी दिली. दुकानाच्या गल्ल्यातील रोख ८० हजार रुपये त्यांनी काढून दिले. त्यानंतर लुटारुंनी कपाटातील सोन्या-चांदीने दागिने घेतले. असा लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लांबवला.

कुकडेजा यांच्या आईस मारहाण
दारूढोसलेले चार लुटारू दोन दुचाकींवरून सहयोगनगरात कुकडेजा यांच्या घरात गेल्यानंतर त्यांनी रिव्हॉल्व्हर, कोयत्याचा धाक दाखवला. घरात त्यांच्या आजी,आई पत्नी आदी बसलेल्या होत्या. दरम्यान, कुकडेजा यांच्या आईस लुटारूंंनी मारहाण केली.

जिवंत काडतूस सापडले
व्यापारीकुकडेजा यांच्या घरात घुसलेल्या एका लुटारूने त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवताना ते लोड केले. तेव्हा एक जिवंत काडतूस घरीच फरशीवर पडले. ते पोिलसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी कुकडेजा यांनी शहर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून जबरी चोरी भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला.

सीसीटीव्ही कॅमेरे विक्री करण्याचे काम करणारे आनंद कुकडेजा यांनी जर त्यांचा घरातच सीसीटीव्ही कॅमेरे लावले असते तर कदाचीत सिनेस्टाइल लुटमार करणारे लुटारू पोिलसांना काही क्षणात पकडता आले असते. दरम्यान, बीड शहरातील गुन्हेगारांचे फोटो असलेला एक अल्बम कुटुंबीयांना दाखवण्यात आलेला आहे, परंतु अद्याप आरोपींची ओळखच पटलेली नाही.