आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छतावरून घरात प्रवेश करून आठ लाख लुटले; अर्धा तास होता थरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- छतावरून घरात प्रवेश करीत चाेरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवत आठ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटला. घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथे गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी श्वानाच्या मदतीने दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र श्वान गावातील गोदावरी नदीपर्यंतच घुटमळले. या घटनेमुळे तीर्थपुरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले अाहे.  
 
मंगरूळ येथील रवींद्र देशमुख हे पत्नीसह घरात झोपले असताना गुरुवारी मध्यरात्री २.१५ वाजेच्या सुमारास तीन जण घराच्या छतावरून घरात घुसले. आवाजाने देशमुख जागे झाले. मात्र त्याचवेळी दरोडेखोरांनी त्यांच्या पोटाला चाकू लावला व त्यांना गप्प बसण्याचे सांगत कपाटातील २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोख २५ हजार रुपये व इतर साहित्य असा आठ लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला. शस्त्राच्या धाकावर दरोडेखोरांनी जवळपास अर्धा तास देशमुख यांच्या घरात लूट केली. त्यानंतर देशमुख यांनी ग्रामस्थांना जागे करून घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी रवींद्र देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सोनवणे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. गावातील गोदावरी नदीपर्यंत माग काढला.
 
बातम्या आणखी आहेत...