आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागमठाणला दरोडा, तीन लाखांचा ऐवज लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - उकाड्याने त्रस्त झालेले कुटुंबीय गच्चीवर झोपलेले असताना चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून ६ तोळे सोन्याचे दागिने व रोख रकमेसह एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरुवारी रात्री नागमठाण येथे घडली. चोरट्यांनी या घरावर हात साफ केल्यानंतर शेजारच्या अन्य एकाची दुचाकी लंपास केली. या दरोड्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागमठाण येथील रामनाथ भागवत तांबे हे पत्नी व दोन मुलांसह घराला कुलूप लावून गच्चीवर झोपले होते. गुरुवारी रात्री १० ते शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान तांबे कुटुंबीय झोपेत असल्याची संधी साधून चोरट्यांनी दाराची कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लाकडी कपाटात ठेवलेले सहा तोळे सोन्याचे दागिने, रोख १ लाख ५ हजार असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांच्या ऐवजासह त्या घराशेजारच्या अन्य एकाचा उभी असलेली दुचाकी (एमएच २० डीपी ०७३१) घेऊन पोबारा केला. हा प्रकार पहाटे ५ वाजेनंतर तांबे कुटुंबीय जागे झाल्यानतर उघडकीस आला. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती वीरगाव पोलिसांना कळवली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पंडितराव नवसारे, विरगाव पोलिस ठाण्याचे फौजदार भास्कर सोनवणे, सहायक फौजदार एच. पी. पालेपवाड, माधव जरारे, एस. बी. राजपूत, बी. ए. कवाल आदींनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक भारती, दरोडा प्रतिबंधक पथकाचे केंद्रे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. औरंगाबाद येथून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...