आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात भरदिवसा साडेसहा लाख लुटले, बँकेच्या रोखपालावर पाळत ठेवून डल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - बँकेची रक्कम भरण्यासाठी जात असलेल्या रोखपालाच्या डोक्यात दांडके मारून लुटारूंनी भरदिवसा ६ लाख ६० हजार रुपये रोख आणि चेक लुटून नेले. हा प्रकार जालन्यातील सुभाष चौकात सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडला.

इंडस इंड बँकेचे रोखपाल अमोल पंढरीनाथ श्रीगादी (३०, लक्ष्मीनारायणपुरा, जालना) शुक्रवारी सकाळी ६ लाख ६० हजार ४०० रुपये रोख आणि ३ लाख २३ हजार ७०० रुपयांचे चेक (१४ चेक) शिवाजी पुतळा परिसरातील अॅक्सिस बँकेत भरण्यासाठी निघाले होते. ते सुभाष चौकात पोहोचले तेव्हा दोघांनी त्यांची दुचाकी (एमएच २१ ऐई ३३३०) अडवली व त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने फटका मारला. जोराचा मार बसल्याने अमोल श्रीगादी खाली कोसळले. त्याच वेळी मारेकऱ्यांनी त्यांची बॅग पळवून नेली. श्रीगादी यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.