आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोंदलगाव मतदान केंद्राजवळ दगडफेक, भाजप कार्यकर्त्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- तालुक्यातील धोंदलगाव येथे मतदान केंद्राच्या परिसरात गुरुवारी गोंधळ घालून दगडफेक करणाऱ्या काही भाजप कार्यकर्त्यांवर वैजापूर पोलिसांनी दंगल आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.  

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली होती. दरम्यान, धोंदलगाव येथील मतदान केंद्राजवळ गावातील भाजपचे कार्यकर्ते बिपिन साळे, सचिन सोळस, बापू वाघ, संतोष आवारे, संतोष मिसाळ, किसन आवारे यांची बंदोबस्तावर तैनात पोलिसांशी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यांचे पर्यवसान दगडफेकीत झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी वरील कार्यकर्त्यांसह इतर तीन ते चार अनोळखीवर सहायक पोलिस निरीक्षक गणेश जामदार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मतदान केंद्राजवळ या कार्यकर्त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून बंदोबस्तावरील पोलिस पथकाला घेराव घालून धक्काबुक्की करत दगडफेक केली. मतदान प्रकियेदरम्यान सामाजिक शांततेचा भंग, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दगडफेकीत राजेंद्र टेके जखमी झाले होते. दरम्यान, धोंदलगाव येथील ग्रामस्थांनी कार्यकर्ते पोलचिटचे वाटप करत असताना  पोलिसांनी त्यांना अडवत वादाला तोंड फोडले असल्याचे सांगितल्यामुळे हे प्रकरण राजकीय पटावर चिघळण्याची शक्यता आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...