आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rotary Club Celebrate Birthday Of HIV infected Children

रोटरी क्लबच्या वतीने एचआयव्हीबाधित मुलांचा वाढदिवस साजरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब - "आम्ही कोणाच्या चुकीची शिक्षा भोगतोय हे माहीत नाही, कुणाचं चुकल आणि कुणाचं बरोबर आहे हेही माहीत नाही. पण तुम्ही आमचा प्रत्येकवर्षी १५ ऑगस्टला जो वाढदिवस साजरा करता, त्यामुळे आम्हाला जगण्याची ऊर्जा मिळत आहे, असे मत सहारा एचआयव्ही बाधित बालकांचा प्रकल्प येथील मुलांनी व्यक्त केले आहे. रोटरी क्लबच्या वतीने या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

आई व वडिलांच्या कळत नकळत झालेल्या चुकाचे ओझे मुलांचे आयुष्य जन्मताच अंधारमय करते. एचआयव्ही या जिवघेण्या आजारामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. या आजारामुळे संबंधित व्यक्तीचे शारीरिक सोबत मानसिक व सामाजिक हानी मोठ्याप्रमाणात होत आसते. जन्मताच या आजाराचा शिक्का यांच्या माथी मारला गेल्यास त्यांचे शैक्षणिक, कौटुंबिक सुख मिळण्याऐवजी सामाजिक हेटाळणी वाट्याला येतो. त्यांना समाजाच्या प्रवाहा बाहेर फेकले जाते.
काहीजण आपली झालेली चूक लपवण्यासाठी मग या मुलांना रस्त्यावर सोडून त्यांचे आयुष्य अंधकारमय करतात. त्यामुळे त्या मुलांना आपले आई- वडील कोण आहेत हे सुद्धा ज्ञात नसते. आशा मुलांचा संभाळ अनेक वर्षापासून कळंब येथील सहारा एचआयव्ही बाधित बालकांचा प्रकल्प करत आहे. सध्या या ठिकाणी ४२ मुले आहेत. या मुलांना आपला वाढदिवस कधी आहे, याचीही माहिती नसते. त्यामुळे कळंब येथील रोटरी क्लबच्या वतीने दोन वर्षापासून एचआयव्हीबाधित मुलांचा १५ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात एकत्रीतपणे वाढदिवस साजरा करण्यात येत आहे.