आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडीक जमिनी दलितांना द्याव्यात; रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- देशातील हजारो एकर पडीक जमिनीपैकी काही जमीन भूमिहीन कुटुंबांना देण्यात यावी. या माध्यमातून त्यांना जमीनदार करून सक्षम बनविण्यात यावे. तसेच शासनाने धोरणात्मक निर्णय योजना राबविताना दलितांच्या विकासाबाबत प्राधान्याने विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केले.

येथील मा. फुलंब्रीकर नाट्यगृहात सोमवारी भूमिहीन गायरान हक्क परिषद पार पडली. या वेळी खासदार आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपाइंचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष अॅड.ब्रह्मानंद चव्हाण होते तर रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भूपेश धूलकर, प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, उपाध्यक्ष मिलिंद शेळके, सुधाकर रत्नपारखे, दौलत खरात, पप्पू कागदे, गणेश रत्नपारखे यांची प्रमुख उपस्थिती होती.खासदार आठवले म्हणाले, भूमिहीनांना जमीन दिल्यास ते स्वकष्टावर स्वत:सोबतच देशालाही सक्षम करतील. ज्या लाेकांच्या जमिनी तलाव, प्रकल्पात जातात. त्यांच्या कल्याणसाठी कुटुंबाला योग्य आर्थिक मोबदला द्यावा. तसेच कुटुंबातील एकाला नोकरी, पेन्शन देऊन त्यांना रोजगाराचे साधन द्यावे. आगामी काळात टंचाई प्रश्न मिटवण्यासाठी सिंचन कामे वाढवावीत. शासनासोबत आपण आहोतच. मात्र दलितांच्या हितप्रश्नी वेळप्रसंगी आंदोलनाची भूमिकाही घेऊ, असेही ते म्हणाले. अॅड.ब्रह्मानंद चव्हाण म्हणाले, शासनाने गायरान जमिनी कास्तकरांच्या नावे सातबारा दिला पाहिजे. तसेच दलितांवर अन्याय होत असताना पोलिसांनी शांत बसण्याची भूमिका घेऊ नये अन्यथा मोर्चा काढू असा इशाराही दिला.
बातम्या आणखी आहेत...