आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Chief Said We Are Humans First, Hindutva Is Came As Need

आम्ही स्वत:स मानव समजतो; गरज म्हणून हिंदुत्व चिकटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - आम्ही स्वत:ला मानवच समजत होतो, समजतो; जेव्हा आम्हाला परकीयांनी विचारले तेव्हा एक ओळख म्हणून आम्ही हिंदू असल्याचे सांगितले. तेच नाव आम्हाला चिकटले आणि आम्ही हिंदू झालो, आता ते अंगवळणी पडले असून ते बदलणे अवघड आहे, असे येथील जाहीर कार्यक्रमात सांगतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या हिंदुत्वातील वेगवेगळे पंथ, चालीरीती, परंपरांना पोटात घेऊन देशात्मबोधाची भावना लोकांमध्ये निर्माण करण्याची गरज व्यक्त केली.

येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालुका शाखेच्या वतीने मोहन भागवत यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. येथील पोलिस कवायत मैदानावर दुपारी ५ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात ५२ मिनिटांच्या भाषणात भागवत यांनी सामाजिक समरसतेवर भर देत हिंदू धर्मातील विविध चाली, रीती, प्रथांना पोटात घेऊन, विविधतेचा सन्मान करून सामाजिक व राष्ट्रीय एकता साधायची आहे, असे सांगितले.

...तर भाग्य बदलेल
कोणतेही सरकार, पक्ष, संघटना देशाचे भाग्य बदलत नाहीत आणि बदलणारही नाहीत. देशाचे भाग्य बदलायचे असेल तर गुणवान समाज निर्माण झाला पाहिजे. तसा समाज निर्माण झाला की आपोआपच देशाचे भाग्य बदलेल. स्वयंसेवक संघही गुणवान समाज निर्माण करण्याचे काम करत आहे.