आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओ कार्यालयाचाही आता दरवाढीचा गिअर !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - सर्वत्र महागाईचा बोलबाला असतानाच परिवहन विभागानेही वाहनांच्या परवान्यासह नोंदणी, आकर्षक क्रमांक आदींच्या नोंदणी शुल्कात वाढ प्रस्तावित केली आहे. याबाबत राज्य शासनाकडून यामुळे प्रभावित होणा-या ंसाठी राजपत्र प्रकाशित करून 15 जानेवारीपर्यंत म्हणणे मागवण्यात आले होते. यावर विचार होऊन आगामी काळात ही प्रस्तावित शुल्कवाढ लागू होण्याची शक्यता आहे.

शुल्कवाढीच्या अनुषंगाने या सुधारणेद्वारे प्रभावित होणा-या व्यक्तींच्या माहितीकरिता परिवहन विभागाने 7 डिसेंबर 2012 रोजी अधिसूचना जाहीर केली होती. या अधिसूचनेद्वारे प्रस्तावित शुल्कवाढीबाबत माहिती जाहीर करून याबाबत संबंधितांकडून त्यांचे म्हणणे मागवण्यात आले होते. आगामी काळात जवळपास सर्वच शुल्कांमध्ये दुप्पट ते तीनपटीने वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

शिकाऊ वाहन परवाना, पक्का वाहन परवाना, नूतनीकरण, डुप्लिकेट कॉपी, नवीन नोंद घेणे, आंतरराष्ट्रीय वाहन परवाना, कंडक्टर बॅच आदींमध्ये दीड ते दोनपट, तर आकर्षक वाहन क्रमांकारिता आकारण्यात येणा-या शुल्कात तीपटीने वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील वाहनांची संख्या : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील नोंदीनुसार दुचाकी 1 लाख 25 हजार आहेत. थ्री व्हीलरची संख्या 12 हजार तर चारचाकी वाहने 34 हजार आहेत.
जालन्यात दोन लाख वाहने : दुचाकी- 1 लाख 50 हजार , तीनचाकी- 15 हजार, अन्य वाहने- 35 हजार अशी आहेत.