आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहाचे नाणे घेण्यास अघोषित बंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव- शहरात दहा रुपयांच्या नाण्यावर व्यापाऱ्यांसह किरकोळ दुकानदारांनी अघोषित बंदी घातल्याने शहरातील शेतमजूर, किरकोळ ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. दरम्यान, दहा रुपयांच्या नाण्याचे शिक्के बंद होणार असल्याची अफवा शहरात पसरली आहे. त्यामुळे शेतमजूर मोठे धास्तावले आहेत. पसरलेली अफवा आणि दुकानदारांचा नाणे स्वीकृतीचा नाचा पाढा यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.  
 
शहरासह ग्रामीण भागात मजूरवर्ग आणि किरकोळ ग्राहक यांच्याजवळ दहा रुपयांचे नाणे मोठ्या प्रमाणावर संचय झालेला आहे, परंतु दुकानदार आणि व्यापारी नाणे स्वीकारत नसल्याने मजुरांना मोठी धडकी भरली आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...