आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रातर्विधीच्या बहाण्याने पळालेला आरोपी अखेर जेरंबद; सायंकाळी डिग्रसमध्ये पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलू- येथील पोलिस ठाण्यातील कोठडीतून पोलिस कोठडी मिळालेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता घडली. मात्र, सायंकाळी त्याला तालुक्यातील डिग्रस जहांगीर शिवारात अटक करण्यात पोलिसांना यश आले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळसूत्र चोरीच्या घटनेत नारायन तिवाड(२१, रा.राजीव गांधी नगर सेलू ) या आरोपीस पोलिस कोठडी मिळाली होती. शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता  शहरात भारनियमन सुरू असताना तिवाड याने  प्रातर्विधीला जाण्याचे कारण सांगून अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांना हुलकावणी देत पसार झाला.

पोलिस कामाला लागले: सेलू पोलिस ठाण्यातून पोलिस कोठडीतील आरोपी पळून गेल्याची घटना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना समजताच आरोपीच्या तपासासाठी अधिकाऱ्यांसह  संपूर्ण पोलिस कर्मचारी कामाला लागले. यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी रेणुका वागळे, पोलिस निरीक्षक दादाहरी चौरे, सपोनि नितीन काशीकर , शंकर पांढरे आदींसह पोलीस कर्मचारी शुक्रवारी पहाटेपासूनच आरोपीचा शोध घेऊ लागले. यात सेलू शहरातील सर्व रस्ते, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी आरोपीला शोधले. एवढेच नव्हे तर सकाळी रेल्वे स्टेशनवर उभी असलेली निजामाबाद-पुणे   पॅसेंजर रेल्वेगाडीतही  शोध घेण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी त्याला डिग्रस जहांगीर शिवारात अटक करण्यात पोलिसांना यश आले. 

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
यापूर्वी देखील सेलू पोलिसांच्या हातून न्यायालय परिसरातून आरोपी पसार होण्याची घटना यापूर्वीही घडली होती. मात्र त्यावेळी पसार आरोपीला पुन्हा ताब्यात घेण्यात  यश मिळाले होते. सेलू पोलिसांच्या ताब्यातून वारंवार आरोपी पळून जाण्याच्या घटनेमुळे शहरातील नागरिकांकडून पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

पोलिस कोठडी असुरक्षित 
सेलू पोलिस ठाण्याची इमारत पुरातन असल्याने मोडकळीस आली आहे. इमारतीच्या दर्शनी भागातच डाव्या बाजूला पुरुष पोलिस कोठडी व उजव्या बाजूला महिला पोलिस  कोठडी दोन्ही पोलिस कोठडीची दुरवस्था झाली आहे. महिला पोलिस कोठडीचा वापर स्टोअर म्हणून करण्यात येतो. तर पुरूष पोलिस कोठडीत स्वच्छतेचा अभाव असल्याने आरोपींना ताब्यात ठेवण्यासाठी सुसज्ज पोलिस कोठडीची गरज आहे.
बातम्या आणखी आहेत...