आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील ४३ अल्पसंख्याक वस्त्यांचा होणार कायापालट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यात असलेल्या अल्पसंख्याकबहुल ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधा मिळाव्यात, अल्पसंख्याक वस्त्यांचा विकास व्हावा आणि त्या ठिकाणी राहणार्‍या नागरिकांचे जीवनमान उंचावे यासाठी प्रत्येक अल्पसंख्याकबहुल ग्रामपंचायतीला प्रत्येकी दहा लाखांचा निधी िवकासकामासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिला जातो.
त्यासाठी वर्ष २०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील अशाच २३ ग्रामपंचायतींची, तर आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने विशेष बाब म्हणून सोयगाव सिल्लोड तालुक्यातील २० ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. त्यामुळे जवळपास ४३ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या अल्पसंख्याकबहुल वस्त्यांचा आता विकास होणार आहे.

राज्यात दरवर्षी दलित वस्त्यांना मूलभूत भौतिक सुविधा देऊन त्या वस्त्यांचा कायापालट केला जातो. विशेषत: वस्त्यात राहत असलेल्या ग्रामस्थांचे जीवनमान आणि राहणीमान उंचावे यासाठी "दलित वस्ती सुधार योजना' राबवण्यात येत आहे. याच धर्तीवर आता अल्पसंख्याक वस्त्यांचा विकास आणि कायापालट होत आहे. अशा वस्त्यांच्या विकासासाठी मागील दोन वर्षांपासून अल्पसंख्याकबहुल ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपयांचा निधी दिला जातो. त्यातून अल्पसंख्याकबहुल वसाहतींचा विकास केला जात आहे. त्यानुसार वर्ष २०१४-२५ मधील जिल्ह्यातील २३ विशेष बाब म्हणून िसल्लोड सोयगाव तालुक्यातील २० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अल्पसंख्याकबहुल वस्तीत सिमेंट रस्ता, ड्रेनेजलाइन, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, कब्रस्तानला संरक्षक भिंत, शादीखाना हॉल आदी कामे करण्यात येणार आहेत. २३ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाख, तर विशेष बाब म्हणून निवड झालेल्या ग्रामपंचायतीला कामाच्या स्वरूपानुसार रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील २३ अल्पसंख्याकबहुल असलेल्या ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकी ग्रामपंचायतीला दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार २३ ग्रामपंचायतींना कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून औरंगाबाद तालुक्यातून गांधेली, लाडसावंगी, पिंप्री खुर्द, देवळाई, तर पैठण तालुक्यातून विहामांडवा, पाचोड बु., बालानगर आणि खुलताबाद तालुक्यातील शूलिभंजन तसेच कन्नड तालुक्यातून पिशोर, अंधानेर गंगापूर तालुक्यातील रायपूर, जोगेश्वरी, लिंबेजळगाव, अगर कानडगाव तसेच सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सारवणी, भराडी, नानेगाव-जंजाळा, अंभई सोयगाव तालुक्यातील सोयगाव ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींमध्ये बौद्ध ६, जैन, अल्पसंख्याक १६ अशा २३ वस्त्यांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अल्पसंख्याकबहुल वस्त्यांमध्ये सिमेंट रस्ते, ड्रेनेजलाइन, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, कब्रस्तानला संरक्षक भिंत, शादीखाना अशी विविध कामे प्रत्येकी दहा लाख रुपये खर्च करून पूर्ण करण्यात येणार आहेत.

विशेष बाबमधून होणार कामे
आमदारअब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातून विशेष बाब म्हणून वर्ष २०१४-१५ मध्ये सोयगाव सिल्लोड तालुक्यातील २० ग्रामपंचायतींना कब्रस्तान संरक्षण भिंत बांधण्यासाठी कोटी ३१ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव, जळकी बाजार, घंटाब्री, वांगी बु., मोढा बु., कोटनांद्रा, डोंगरगाव, आमठाणा, धामणी, अन्वी, शिंदेफळ, चारनेर, लोणवाडी, म्हसला खुर्द, तर सोयगाव तालुक्यातील जरंडी, निंबायती, कवली, वेताळवाडी, सावळदबारा जामठी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...