आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदाभाऊ खोत यांनी स्वतः केले शौचालयाचे बांधकाम, शोषखड्ड्यात उतरून केले काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजवण्याच्या उद्देशाने व जिल्हा शंभर टक्के दुर्गंधीमुक्त करण्यासाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी (दि. २३) स्वतः शोषखड्ड्यात उतरून प्रत्यक्ष शौचालयाचे बांधकाम केले. सेलू तालुक्यातील काजळे रोहिणा ग्रामपंचायतीमध्ये शौचालय बांधकामाची सुरुवात राज्यमंत्री खोत यांनी केली.  
 
खोत यांनी स्वत: खड्ड्यात उतरून प्रत्यक्ष शौचालयाचे बांधकाम केले. त्यानंतर  गावात विविध ठिकाणी शौचालय  बांधकामाची सुरुवात करण्यात आली. गावात गावफेरीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, उघड्यावर शौचास गेल्यामुळे महिलांना जास्तीत जास्त आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे स्वतःसाठी नाही, पण महिलांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांच्या प्रतिष्ठेसाठी प्रत्येकाने  शौचालय बांधण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. तसेच शौचालय बांधकामात जे सरपंच, ग्रामसेवक किंवा संस्था प्रभावी कामगिरी करतील, अशा व्यक्तींचा विशेष गौरव करण्यात येणार असल्याचेही खोत यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर, सेलूचे उपविभागीय अधिकारी बोरगावकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती अशोक काकडे, स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे, सेलू पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम पावडे उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...