आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सद्गुरू प्रतिष्ठानचे नऊ वर्षांपासून यज्ञकार्य, बीडमार्गे जाणाऱ्या दिंड्यांची अकरा दिवस सेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या माउली भक्तांची सेवा करताना उत्साहात तसूभरदेखील कसर पडणार नाही याची काळजी घेत येथील सद््गुरू परिवाराने यंदाही सलग अकरा दिवस याेगदानातून विठ्ठल सेवेचे यज्ञकार्य पार पाडले.

धुळे- साेलापूर राष्ट्रीय महामार्गावरून खान्देश, विदर्भ, मराठवाडा, जालना, औरंगाबाद जिल्ह्यातील शंभरावर लहान - माेठ्या दिंड्या बीडमार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. दिंडीतील वारकऱ्यांसाठी प्रसाद सेवेचा उपक्रम येथील सद््गुरू प्रतिष्ठानने नामलगाव फाट्यानजीक अकरा दिवस राबवला. निवारा, फराळ, जेवणासाठी विस्तृत जागा, स्वयंपाकगृह, पिण्याच्या शुद्ध व थंड पाण्याची व्यवस्था प्रतिष्ठानने केली. त्यामुळे मजल- दरमजल करणाऱ्या वारकऱ्यांसाठी प्रतिष्ठानची सेवा नऊ वर्षांपासून हक्काची ठरली अाहे. अंघोळीसाठी पाणी उपलब्ध करून वारकऱ्यांना न्हाऊ घालताना कार्यकर्ते धन्य समजतात. सद््गुरू प्रतिष्ठानचे दीडशेहून जास्त सदस्य आहेत. दरवर्षी या उपक्रमाला साधारण तीन लाखांपर्यंत खर्च येताे. आचारी, भांडी, भाजी, किराणा, शेड, प्रसाद सेवेत प्रत्येक जण आर्थिक सहभाग देतात. व्यवहार पाह्यचा नाही अाणि संकाेच बाळगायचा नाही, हेच सूत्र प्रतिष्ठानने अवलंबिले.

नऊ वर्षांपासून आषाढी एकादशीच्या वीस दिवस आधीपासून या सेवेला प्रारंभ होतो. अकरा दिवस वारकऱ्यांंची मनोभावे सेवा केली जाते. यंदा पिंपळनेर व म्हाळस जवळा येथील तरुणांनीही या सेवाकार्यात सहभाग नाेंदवला. सकाळी सहा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत अल्पोपाहार, फराळ, भाेजनाचा येथे भंडारा सुरू असतो. काही वेळ विसावा घेणारे वारकरी सेवेचा आस्वाद घेत तृप्त होतात,तर या सेवेतच विठ्ठलभक्तीचा अानंद प्रतिष्ठानचे सदस्य मानतात.
खास मेनू
भंडाऱ्यात साबुदाणा खिचडी, फळे, भगर, आमटी, बुंदी, खमंग व स्वादिष्ट भाजी, खिचडी, मसालेभात, पोळी, भाकरीचा मेनू अालटून पालटून ठरलेला हाेता. तर साेनपापडी, खवा बर्फी, खाेबरा बर्फी, बेसन बर्फीचा मधुर स्वाद वारकऱ्यांनी चाखला.
धुळे-सोलापूर महामार्गावरून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांची सद्््गुरू प्रतिष्ठानच्या वतीने अकरा दिवस प्रसाद सेवा करण्यात आली. छाया: दीपक जवकर
अाम्ही धन्य झालाे
अमरनाथ यात्रेदरम्यानची लंगर सेवा पाहून बीड येथे पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करण्याचे सुचले. यंदा वारकऱ्यांची संख्या नेहमीपेक्षा जास्त हाेती. राष्ट्रसंत मां कनकेश्वरी यांच्या प्रेरणेने ही इच्छा साकार होताना प्रतिष्ठान धन्य झाले आहे.
रमण बाहेती, सद्गुरू प्रतिष्ठान.
बातम्या आणखी आहेत...