आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadhu Sant Comment On Bhayuji Maharaj At Osmanabad

साधू-संतांनी महिलांना एकांतात भेटूच नये; भय्यू महाराजांचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- साधू-संत राष्ट्राची संपत्ती असतात. त्यांनी भक्तांना खुलेआम भेटले पाहिजे. त्यांनी महिलांना एकांतात भेटूच नये, असे स्पष्ट मत राष्ट्रसंत भय्यू महाराज यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भय्यू महाराज म्हणाले, हल्ली समाजात विकृती प्रचंड वाढली असल्याने अत्याचारही वाढले आहेत. केवळ रस्त्यावर उतरून आंदोलने केल्याने ही परिस्थिती बदलणार नाही. यासाठी प्रत्येकाने स्वत:मध्ये बदल करून घेण्याची गरज आहे. आसारामबापूंविषयी ते म्हणाले की, संत तुकाराम, संत कबीर यांनाही समाजातून विरोध सहन करावा लागला होता; परंतु संतांनी महिलांना एकांतात भेटण्याची काही गरज नाही. ‘सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं.’ आसाराम हे पूर्णत: सत्य असतील असे मी म्हणत नाही. मात्र, साधू-संतांसह नागरिकांनी संयमाने वागण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पद्मभूषण हा पुरस्कार सिनेअभिनेता, अभिनेत्रींना देऊ नये. समाजाची जडणघडण करण्यात त्यांचे योगदान काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या वेळी त्यांनी हल्लीच्या काळात जाणवणार्‍या सामाजिक समस्यांवर भाष्य केले.