आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईबाबा शुगर्सची पाच कोटींची मालमत्ता जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - औसा तालुक्यातील गोंद्री येथील साईबाबा शुगर्स लि. या खासगी साखर कारखान्याची ५ कोटी १५ लाख रुपयांची जंगम मालमत्ता औशाच्या तहसीलदारांनी जप्त केली. कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम न दिल्याने साखर आयुक्तांच्या आदेशाने ही कारवाई केली. जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करून शेतकऱ्यांचे देणे देण्यात येणार आहे.
साईबाबा शुगर्सने २०१४-१५ या गळीत हंगामामध्ये २ लाख १६ हजार मे. टन उसाचे गाळप केले होते; परंतु उसाच्या बिलाची रक्कम संबंधित कारखान्याने शेतकऱ्यांना दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी कारखाना व्यवस्थापन, जिल्हाधिकारी, साखर आयुक्तांकडे गाळप झालेल्या उसाचे पैसे देण्याची मागणी केली. त्यासाठी आंदोलनेही करण्यात आली. त्यानंतर नांदेड येथील साखर सहसंचालकांनी साईबाबा शुगर्सच्या व्यवस्थापनास शेतकऱ्याचे देणे असलेली १८ कोटी ११ लाख ४६ हजारांची रक्कम देण्याचे आदेश दिले होते; पण त्यानंतरही साखर कारखान्याने उसाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली.

परिणामी गेल्या महिन्यात साखर आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी या साखर कारखान्याची
मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे आदेश दिले होते.
भारस्कर यांची नियुक्ती
साखर आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी औशाचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांची नियुक्ती केली.