आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saints Give Cleaniness Mantra For Swacch Bharat Abhiyan

स्वच्छ भारत अभियानाला संत देणार स्वच्छतेचा मंत्र!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत साधूसंत कीर्तन प्रवचनातून पंढरपूरसोबत राज्यभरातही 'झाडू संतांचे मार्ग' उपक्रम हाती घेणार आहेत. वारकरी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला ही माहिती दिली.

७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान नांदेड येथे चौथे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होणार आहे. त्याबाबत विठ्ठल महाराज म्हणाले, संमेलनात संत साहित्याचा प्रसार, प्रचार होईल. अनिष्ट रूढी, परंपरा नष्ट करत मानवतावादी विचार समाजात न्यावा लागेल. संमेलनातील खुल्या अधिवेशनात प्रत्येकाने मी माझा देश स्वच्छ ठेवीन, असा ठराव घेण्यात येईल. राज्यातील साधू, संत प्रवचन, कीर्तनातून स्वच्छतेचा मूलमंत्र देतील. संस्थानपासून त्याचा प्रारंभ होईल.

देवस्थान मंत्रालय स्वतंत्र करा
संत साहित्य संमेलनात पंढरपूर पालखी मार्ग तातडीने करावा. पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्री स्वच्छतागृह सार्वजनिक ठेवू नये, वनीकरणाच्या जमिनीहून अधिक जमीन देवस्थानांना आहे. त्यामुळे देवस्थानसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापावे. जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यालय सुरू करावे आदी मागण्यांचे ठराव संमेलनात मंजूर केले जाणार असल्याचे विठ्ठल पाटील म्हणाले.