आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेडचा नांदेडात मोर्चा, पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- मराठा सेवा संघप्रणीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुरुवारी छत्रपती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे, जिल्हाध्यक्ष संकेत पाटील यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला.

तरोडा नाका भागातील छत्रपती चौकातून निघालेला मोर्चा रिजनल वर्कशॉप, श्रीनगर, आयटीआय चौक, शिवाजीनगर, कलामंदिर, वजिराबाद चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात शेतकरी जवळपास ५० बैलगाड्या घेऊन सहभागी झाले. मोर्चात ५०० पेक्षा अधिक शेतकरी सहभागी होते. राष्ट्रसंत गाडगेबाबा प्रबोधन कक्ष, जिजाऊ ब्रिगेड, पद्मश्री विखे पाटील कृषी परिषद, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, जगद््गुरू तुकोबाराय साहित्य परिषद आदी संघटनांचे कार्यकर्तेही मोर्चात सहभागी झाले. मोर्चात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर शिवाजीराजे पाटील, प्रा. डॉ. गणेश शिंदे, डॉ. सोपानराव क्षीरसागर व अॅड. मनोज आखरे यांनी मार्गदर्शन केले. मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी काकाणी यांना निवेदन दिले.