आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरखेडच्या अपघातग्रस्त चौघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरिश्‍चंद्र बंग - Divya Marathi
हरिश्‍चंद्र बंग
परभणी - रहाटीजवळ मंगळवारी रात्री झालेल्या अपघातातील उमरखेडच्या चौघा मृतांवर बुधवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमाराला हिंदू मोक्षधाम स्मशानभूमीत एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जवळपास 10 हजार शोकाकुल नागरिक उपस्थित होते. अन्य दोघांवर त्यांच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघातात ठार झालेल्या उमरखेडच्या चारही जणांचे मृतदेह सकाळीच शहरात आणण्यात आले. या घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. मृत हरीश बंग व जगदीश बंग सख्खे भाऊ होते. इतर दोघेही आप्तस्वकीयच असल्याने सर्वांचा एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मेडिकल वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद होती. व्यापार्‍यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून मृतांना श्रद्धांजली वाहिली.
जगदीश बंग
दोन्ही वाहनांची दिशा विरुद्ध असल्याने समोरासमोरच ही धडक झाली असल्याचे स्पष्ट होते. मात्र, अपघातानंतर दोन्ही वाहने एकाच दिशेत कशी आली, कंटेनर 16 टायरांचा असल्याने धडक झाल्यानंतर जीपची दिशा बदलली असावी. कंटेनर चालक फरारी आहे. प्रणय अशोक, सहायक पोलिस अधीक्षक, परभणी
दोघांची प्रकृती चिंताजनक
दिनेश तेला (38) व जीपचालक यादव गायकवाड (35) गंभीर जखमी झाले. दोघांना परभणीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तेला यांच्या डोक्यास मार लागल्याने त्यांना नांदेड येथे हलवले. गायकवाडवर उपचार सुरू आहेत. आशिष शर्मा, धनंजय पल्लेवार व गुडू (22) यांनाही मार लागला. मात्र, उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली.