आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धीच्या सर्वेक्षणास आलेल्या अधिकाऱ्यांना ठेवले डांबून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी - इगतपुरी तालुक्यात समृद्धी महामार्गासाठी एकीकडे थेट खरेदी सुरू केली अाहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा विरोध काही मावळताना दिसत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी तळोशी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मालमत्ता सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी आलेले कृषी अधिकारी एस. पी. पाटील, प्रमोद विसपुते, आर. डी. जोशी, जी. के. पानसरे यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ आली. त्यांना तब्बल चार तास डांबून ठेवण्यात आले. विरोधाचे निवेदन स्वीकारल्यानंतरच त्यांना सोडण्यात आले.   
 
दुटप्पी धोरणाचा निषेध   
> शासनाकडे वेळोवेळी ग्रामसभेचे ठराव, हरकती नोंदवल्या आहेत. आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्याच नाहीत. शासन सर्वेक्षणाचा घाट घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे. आम्ही  सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत चर्चा करून जोपर्यंत तोडगा काढला जात नाही तोपर्यंत प्रक्रिया थांबवावी, असे कळवले असतानाही अधिकारी अाले. या दुटप्पी धोरणाचा आम्ही निषेध करतो.   
भास्कर गुंजाळ, सचिव, शेतकरी संघर्ष कृती समिती
बातम्या आणखी आहेत...