आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंगी घाटाच्या नावाखाली अवैध वाळू उपसा, प्रशासनाचे वाळूमाफियांकडे दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - गोदावरी नदीकाठच्या गावांना यापूर्वी कधीच पाणीटंचाई उद््भवली नाही. मात्र, पैठण तालुक्यातील एकाही वाळूपट्ट्याचा लिलाव झालेला नसतानाही गोदावरी नदीपात्रातून बेसुमार आजघडीला सर्रास वाळू उपसा सुरू अाहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्या विहिरी यंदा सहा महिन्यांतच कोरड्या पडल्या आहेत. नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळेच ही परिस्थिती उद््भवल्याचा सूर उमटत आहे.

गोदापात्रातून होणाऱ्या बेसुमार अवैध वाळू उपशाकडे महसूल आण पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षाने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.
याबाबत नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तहसील प्रशासन मात्र शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील लिलाव झालेल्या वाळूपट्ट्यातून उपसा होत असल्याचा बनाव करत अाहे. मात्र लिलाव झालेल्या मुंगी येथील गोदावरी पात्राच्या वाळूपट्ट्याच्या नावाखाली पैठणच्या हद्दीतील गोदावरी पात्रातून राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे. महसूल प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने मात्र डोळेझाक केल्याचे चित्र दिसून येते. पैठणच्या वाळूला औरंगाबाद, नगर, जालना या भागातून मोठी मागणी असल्याने येथील वाळूला सोन्याचा भाव सध्या वाळूचा लिलाव न झाल्याने मिळतो. काही राजकीय पुढाऱ्यांसह संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अभयामुळे माफियांना वाळू उपसा करण्यासाठी पात्र मोकळे झाले आहे. याबाबत तहसीलदारांना विचारणा केली असता त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.

कार्यालयच बनला अड्डा : गोदापात्रातील एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नाही. परंतु अवैध वाळू उपसा करणारी टोळी दिवसभर तहसीलमध्ये तळ ठोकून असते.

पथक कागदावरच : आपेगाव, पाटेगाव, हिरडपुरी, नायगाव, मायगावसह पैठणच्या हद्दीतून वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने पथक नियुक्त केले होते.

वाळू उपसा थांबवा
गोदावरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याने या पट्ट्यातील नदीपात्राची पाणी साठवण क्षमता घटली आहे. त्यामुळे तालुक्यातील अवैध वाळू उपसा थांबवला जावा; अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. -विजय गोरे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
बातम्या आणखी आहेत...