आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूमाफीयांचा पोलिस पथकावर जबरी हल्ला, तीन पोलिस गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्माबाद - धर्माबाद पोलिसांच्या गस्ती पथकावर वाळूमाफीयांनी हल्ला चढवला. २५ जणांच्या टोळक्याने पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड केली. ही घटना बेल्लूर येथे घडली. या मारहाणीत तीन पोलिस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले.
पोलिस उपनिरीक्षक अमोल नाईक यांना बेल्लूर गोदापात्राच्या परिसरात रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी आपला मोर्चा घटनास्थळाकडे वळवला. पोलिसांचे पथक आल्याचे पाहून वाळूमाफीयांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. धुमश्चक्रीनंतर पोलिसांनी सात जणांना पकडले. पंचायत समितीचे माजी सभापती नागोराव इरवंतावारले, मारुती श्रावण माकणे, सुधीर पाटील कमळण (ता.मुदखेड), नंदिकिशोर सूर्यवंशी, नेहरू पवार उद्रा, लक्ष्मण जाधव (इजळी, ता. मुदखेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.अन्य आरोपी फरार झाले आहेत. वाळूने भरलेले तीन टिप्पर, ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले. पोलिस अधीक्षक परमजितसिंह दाहिया यांनी अतिदक्षता पथकासह धर्माबादला भेट दिली. पोलिसी खाक्या दाखवताच वाळूमाफीयांची मोठी साखळी समोर येण्याची शक्यता आहे. अनेक प्रतिष्ठित राजकीय मंडळीचाही यात हात असण्याची शक्यता आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.