आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळूमाफियांचा शोध लागेना !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपींचा शोध अद्यापही लागलेला नाही. बासंब्याचे फौजदार झुंबरलाल लोंढे रविवारी ट्रॅक्टर चालकांचा शोध घेण्यासाठी पुसद येथे गेले होते, परंतु त्यांना सायंकाळपर्यंत आरोपींचा शोध लागला नाही. आरटीओ कार्यालयाकडून वाहन क्रमांकाच्या आधारे मालकाचा पत्ता शोधण्यात येणार आहे, परंतु रविवारची सुटी असल्याने पोलिसांना अधिक माहिती मिळू शकली नाही.

रविवारी पोलिसांनी पातोंडा येथे जाऊन सरपंच पंढरीनाथ मार्कड, तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग मार्कड आदी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. हिंगोलीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर हे महसूल कर्मचार्‍यांच्या पथकासह शनिवारी पातोंडा येथील पैनगंगा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणार्‍यांविरुद्ध कारवाईसाठी गेले होते. तहसीलदारांनी थांबण्याची सूचना करूनही एमएच-29 व्ही- 1728, एमएच-29 व्ही-965, एमएच 29- सी 3620 व एमएच 30- जे-5460 या क्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकांनी तहसीलदारांच्या दिशेने ट्रॅक्टर आणले होते. याप्रकरणी तहसीलदारांनी बासंबा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दिली. इजा होईल या उद्देशाने अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.