आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळू वाहतूक, 40 ट्रक जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केदारखेडा - भोकरदन तालुक्यातील गव्हाण संगमेश्वर परिसरात पुर्णा नदीतून अवैध वाळू वाहतूक करणार्‍या 40 ट्रकवर उपविभागीय अधिकार्‍यांनी छापा मारुन कारवाई केली. शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली, यावेळी 22 वाहनचालकांनी पळ काढला.
गव्हाण संगमेश्वर परिसरात पुर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. या माहितीवरुन उपविभागीय अधिकारी डॉ. एन. आर. शेळके यांच्या पथकाने शनिवारी सकाळी सहा वाजता या भागात दाखल होऊन कारवाई सुरु केली. महसूल विभागाच्या पथकाला पाहताच काही वाहनचालकांनी वाहनांसह पळ काढला. मात्र पाच तास चाललेल्या या कारवाईत 40 वाहने पकडण्यात पथकाला यश आले. मात्र पंचनामा सुरु असतानाच 22 वाहनचालकांनी वाहनांसह पळ काढला. उर्वरित वाहने भोकरदन पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. गव्हाण संगमेश्वर, जवखेडा ठोंबरे येथे वाळूचे लिलाव झालेले नसताना हा उपसा सुुरु होता. त्यामुळे नदीपात्रात मोठ मोठे खड्डे पडले असुन महसूल बुडत आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले असुन अशा प्रकारची कारवाई सातत्याने सुरु ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.या कारवाईत भोकरदनच्या तहसीलदार रुपा चित्रक, जाफराबादचे प्रभारी तहसीलदार संदीप ढाकणे, अभय देशपांडे, तलाठी गणेश तांगडे, विजय गरड आदींचा समावेश होता.

वाळू उपशानंतर खड्डयांचे सपाटीकरण
पुर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात आला आहे. हा प्रकार लक्षात येऊ नये म्हणून वाळू तस्करांनी भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. त्यासाठी एका खास बुलडोझरद्वारे खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. शनिवारी पथकाने केलेल्या कारवाईत हा बुलडोझरही ताब्यात घेण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातून केलेल्या बेसुमार वाळू उपशाचे पुरावे नष्ट करण्यात तस्करांना काही प्रमाणात यश आले आहे.