आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanny Liony Not Come In Latur Due To Health Problem

सनी लिओनची प्रकृती ऐनवेळी बिघडली अन् लातूरची भेट टळली, एप्रिल फूल केल्याची तरुणाईची भावना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूरमध्ये नव्याने सुरू झालेल्या कपडा दालनाच्या उद्घाटनाला हिंदी चित्रपटसृष्टीतील चर्चित अभिनेत्री सनी लिओन येणार, असे जाहीर करण्यात आले होते. तिची एक झलक पाहण्यासाठी सकाळपासून या दालनासमोर तरुणांनी गर्दी केली होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती येणार नाही, असे संयोजकांनी जाहीर केल्यानंतर सकाळपासून साठवून ठेवलेल्या उत्साहाचे रूपांतर घोर निराशेत झाले.
शेवटी आणखी पंधरा दिवसांनी सनी लिओन नक्की येणार, असे सांगत बळाचा वापर करून तरुणांना हाकलून लावण्याची वेळ संयोजकांवर आली. बार्शी रस्त्यावरील पीव्हीआर चौकात शाखेचे उद््घाटन स्थानिक आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते होणार होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून अभिनेत्री सनी लिओन येणार होती. पोर्न स्टार अशी ओळख असलेल्या सनी लिओनला पाहण्यासाठी गर्दी होणार हे अपेक्षित धरून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळी नऊ वाजता उद््घाटन होईल आणि साडेदहा वाजेच्या सुमारास सनी लिओन सदिच्छा भेट देणार, असे संयोजकांनी जाहीर केले होते. त्यामुळे सकाळपासूनच पीव्हीआर चौकात तरुणांनी मोठी गर्दी केली होती. किमान चार हजार तरुण दालनासमोर रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. मात्र, सकाळीच प्रकृतीच्या कारणामुळे सनी लिओन येणार नाही हे कळल्यानंतर संयोजकांनी लाउडस्पीकरवरून तसे जाहीर केले. गर्दी टाळण्यासाठी ही सूचना केली जात अाहे, असे म्हणत तरुणांनी जागा सोडली नाही. त्यानंतरही संयोजकांनी वारंवार सनी लिओन येणार नाही, असे घोषित केले.
मात्र, त्याचा तरुणांवर कसलाच परिणाम झाला नाही. मात्र, जमाव आक्रमक होईल, या भीतीने पोलिस आणि संयोजकांच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी बळाचा वापर करून गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न सुरू केला. शेजारच्या इमारतींवर थांबलेल्यांना हुसकावण्यात आले. तब्बल तीन तास उन्हात थांबूनही सनी लिओन येणार नाही, यावर तरुणांचा विश्वस बसत नव्हता. ती कोणत्याही क्षणी येईल, असेच मुलांना वाटत होते. अखेर आपल्याला एप्रिल फूल केल्याचे म्हणत हळूहळू तरुणाई पांगली.