आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- आम्हा आवडे नाथ, पांडुरंग नाही आम्हा भेदभाव या अभंगाप्रमाणे नाथवंशजांच्या दोन्ही पालखी सोहळ्यास हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपूरसाठीच्या  दिंडीत सहभागी होण्यासाठी पैठणनगरीत शुक्रवारी दाखल झाले. संत एकनाथ महाराज यांच्या पादुकांची नाथवाड्यातून मिरवणूक काढत पालखी ओट्यावर या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. भक्तिरसाने चिंब झालेला वारकरी टाळ- मृदंगाच्या गजरात पांडुरंग- एकनाथ- भानुदासाच्या नामघोषात शुक्रवारी शांतिब्रह्म संत एकनाथाच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाला. या पालखीचे सूर्यास्तसमयी पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
 
माझे जिवाची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी या अभंगाप्रमाणे आज औरंगाबाद जालना, परभणीसह पैठण तालुक्यातील हजारो वारकरी सकाळपासूनच पैठणनगरीत दाखल झाले होते. नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी, सरदार महाराज गोसावी, पुष्कर महाराज गोसावी, छय्या महाराज यांनी आपली पालखी दरवर्षीप्रमाणे यंदाही काढली. यंदा याला व्यापक स्वरूप दिल्याने रघुनाथबुवा पालखीवाले यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, आज रघुनाथबुवा यांची नाथ पादुकांची पालखी दिंडी सुरुवातीला काढली, त्यानंतर दुसरी दिंडी छय्या महाराज गोसावी यांची निघाली.
बातम्या आणखी आहेत...