आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sant Eknath Sugar Factory Haribhau Bagade Paithan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संत एकनाथ कारखाना हरिभाऊ बागडेंकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना चालवण्यास छत्रपती संभाजीराजे उद्योगाचे अध्यक्ष माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांनी तयारी दर्शवली आहे. कारखान्याचे चेअरमन संदिपान भुमरे व हरिभाऊ बागडे हे साखर आयुक्तांना भेटण्यासाठी पुण्याला गेले आहेत. यादरम्यान कारखाना किती महिने चालवण्यासाठी द्यायचा यासंदर्भात विचारविनिमय होणार आहे, असे संचालक संदिपान भुमरे यांनी सांगितले.

हा कारखाना कुणालाही चालवण्यास देण्याची भूमिका संचालक मंडळाने घेतली होती. तसेच जो शेतकर्‍यांच्या उसाला योग्य भाव देईल व विविध अटी पूर्ण करील, त्याला हा कारखाना चालवण्यास देण्याची भूमिका भुमरे यांनी घेतली होती. आता हा कारखाना चालवण्यास माजी राज्यमंत्री हरिभाऊ बागडे यांनी तयारी दाखवल्याने संचालक मंडळासह नोकरदार, ऊस उत्पादक चिंतामुक्त झाले आहेत.