आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘संत एकनाथ’ चा उसाच्या दुसऱ्या हप्त्याचा मुहूर्त टळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्यावर शेतकऱ्यांना उसाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा होती. आज १७ ऑगस्ट रोजी उसाच्या दुसऱ्या हप्त्याचे वाटप करण्यात येणार होते. मात्र, आजचा मुहूर्तही हुकला असून सध्या बिले तयार करण्याचे कामे सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बिले तयार झाल्यानंतर दुसऱ्या हप्त्याचे वाटप या दोन-तीन दिवसांत होईल, अशी माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे.

‘दिव्य मराठी’ने सतत उसाच्या दुसऱ्या हप्त्यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले हाेते. यात संत एकनाथ कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन तुषार शिसोदे यांनी १० आॅगस्टपूर्वीच उसाचा दुसरा हप्ता वाटप करण्याचे जाहीर केले होते, तर घायाळ शुगर्सचे चेअरमन सचिन घायाळ यांनी १७ आॅगस्टचा मुहूर्त काढला होता. तशी तयारी घायाळ यांनी केली, मात्र काही तांत्रिक कारणाने ४ हजार १०० शेतकऱ्यांची बिले आज वेळेत तयार झाली नसल्याने आजचा मुहूर्त टळला. त्यामुळे आता तालुक्यातील राजकारण अधिकच रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे.

तालुक्यातील राजकारण्यांचा प्रमुख पाया हा संत एकनाथ सहकारी साखर कारखाना राहिला आहे. याच कारखान्याच्या राजकारणावर आमदार संदिपान भुमरे यांनी तालुक्याच्या राजकारणात आपली पकड कायम ठेवली. मागच्या टर्मला मात्र कारखाना बंद राहिल्यास आपल्या आमदारकीला मोठा अडथळा होण्याच्या भीतीपोटी आमदार भुमरे यांनी सचिन घायाळ यांना हा कारखाना १८ वर्षांसाठी भाडेत्त्वावर चालविण्यास दिला. मात्र, घायाळ यांचे तालुक्यात राजकीय वर्चस्व निर्माण होत असल्याचे पाहता आमदार भुमरे यांना घायाळ नकोसे झाले.

त्यातून हा कारखाना चालू असतानाच २६ जानेवारीला बंद करावा लागला होता. यामुळे घायाळ यांनी भुमरेंविरोधी नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार संजय वाघचौरे, तुषार शिसोदे यांच्याबरोबर पॅनल करत भुमरे यांना जबर
झटका दिला असला तरी आता भुमरे हे कारखाना बंद पाडण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

कारखाना सुरू करण्याविषयीचे दोन दावे
सचिन घायाळ यांनी आधी आपणास कारखाना सुरू करण्यास येणारे अडथळे दूर करा, तरच कारखाना सुरू करण्याचा विचार करू, नसता यंदा कारखाना बंद ठेवणार, असे जाहीर केले होते. त्यावर एकनाथचे चेअरमन तुषार शिसोदे यांनी आपण कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करणार असून यासाठी घायाळ यांना सहकार्य करू, असे सांगितले होते.
बातम्या आणखी आहेत...