आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्याच्या प्रियाचा शंभर तास मेंदी काढण्याचा संकल्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - "मुलगी वाचवा'चा संदेश देत जालन्यातील प्रिया सुरडकर ही युवती सलग शंभर तास मेंदी रेखाटण्याचा अनोखा विक्रम साकारणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेपासून या उपक्रमाला सुरुवात होणार अाहे. या माध्यमातून जवळपास शंभर महिलांच्या हातावर मेंदी
रेखाटली जाणार आहे.
औरंगाबाद येथील इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या प्रिया सुरडकरला लहानपणापासूनच मेंदी काढण्याची आवड आहे. या माध्यमातून काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असल्याने तिने आपल्या या छंदाला सामाजिक विषयाची जोड दिली. त्यातूनच "सेव्ह गर्ल चाइल्ड' अर्थात "मुलगी वाचवा'चा संदेश देण्यासाठी सहाशे महिलांच्या हातावर मेंदी रेखाटण्याचा संकल्प तिने केला आहे. २४ डिसंेबर रोजी सकाळी ११ वाजता या उपक्रमास सुरुवात होणार आहे. भोकरदन नाका येथील आयएमए हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. यात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेच्या हातावर मेंदीसोबतच "मुलगी वाचवा' असा संदेश लिहिला जाणार आहे. िगनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड््समध्ये या विक्रमाची नोंद करण्यासाठी संयोजकांनी गेल्या चार महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. या उपक्रमास मोठा आर्थिक खर्च आवश्यक असल्याने शहरातील अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. १८ वर्षांवरील युवती व महिलांना या उपक्रमात सहभागी होता येईल, त्यासाठी त्यांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
यापूर्वीचे विक्रम : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये यापूर्वी दोन वेळा जालन्याचे नाव नोंद झाले आहे. २००३ मध्ये प्रसाद चौधरी यांनी सलग ४८ तास तबलावादन करून अनोखा विश्वविक्रम नोंदवला हाेता, तर रवी कोंका यांनी १ फेब्रुवारी २०१० रोजी ७६ हजार ६७० स्क्वेअर फुटावर रांगोळी रेखाटली होती. या दोन्ही उपक्रमांची गिनीज आणि लिम्का बुकात नोंद झाली आहे.
मेंदीचा विक्रम असा : यापूर्वी ७ ते १० जानेवारी २०१४ रोजी नागपूर येथील सुनीता नारायण धोटे यांनी ७३ तास ५५ िमनिटे एकाच जागेवर बसून मेंदी काढण्याचा विश्वविक्रम नोंदवला होता. तो विक्रम मोडण्यासाठी जालन्याच्या प्रियाने तयारी सुरू केली अाहे.
प्रा. कोंका यांचे मार्गदर्शन : या उपक्रमासाठी प्रियाला प्रा. अशोक कोंका यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यापूर्वी त्यांनी जालन्यातील दोन आणि बीड येथील एका उपक्रमाची िगनीज बुकात नोंद करण्यासाठी मार्गदर्शन केले होते. विश्वविक्रमासाठी या उपक्रमाच्या सर्व तांत्रिक बाजू तेच पूर्ण पाहणार आहेत.
महिलांचे सहकार्य आवश्यक
^
सलग शंभर तास सहाशे महिलांच्या हातावर मेंदी रंगवण्यासाठी मी पूर्ण मानसिक तयारी केली आहे. यात १८ वर्षांवरील युवती व महिलांच्या हातावर ही मेंदी काढली जाईल. त्यामुळे जालनेकर महिलांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. मी हा विश्वविक्रम नक्कीच पूर्ण करीन, असा विश्वास आहे.
प्रिया सुरडकर, जालना