आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहार प्रकरण : बँकेच्या व्यवस्थापकावर गुन्हा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - ग्राहकाच्या खात्यातून चार लाख 80 हजार रुपयांच्या रकमेचा अपहार प्रकरणात भारतीय स्टेट बँक आॅफ हैदराबाद शाखेचे व्यवस्थापक अजय कोटणीस यांच्यासह पाच कर्मचा-यांवर पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. अटकेच्या भीतीने पाचही आरोपी फरार झाले आहेत.
तपास अधिकारी साहाय्यक पोलिस निरीक्षक जयराम तावडे आरोपींना अटक करण्यासाठी सोमवारी बँकेत गेले होते. आरोपी बँकेकडे फिरकलेच नसल्याचे इतर कर्मचा-यांनी सांगितले. दरम्यान, 10 जानेवारीला सुनील अप्पासाहेब शिंदे या व्यक्तीने सुवर्णा चांगदेव उघडे या महिलेच्या बनावट स्वाक्षरीच्या धनादेशाद्वारे चार लाख 80 हजारांची रक्कम बँकेतून काढली. त्या वेळी सीसीटीव्ही कॅमेºयाने टिपलेल्या दृश्याची पाहणी पोलिसांनी केली. तसेच या वेळी इतर खातेदारांचीही पोलिसांनी चौकशी केली.
आरोपी सुनील शिंदेने रोकड काढल्यानंतर खंडाळा येथील व्यापारी संजय सूर्यवंशी यांच्या मुलाकडून पैसे ठेवण्यासाठी पिशवी मागितली होती. त्या मुलालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.