आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Scam In Maharashtra Darshan In Osamanabad, 209 Teachers Collect 18.5 Lakh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उस्मानाबादेत महाराष्‍ट्र दर्शन योजनेत घोटाळा, 209 शिक्षकांकडून 18.5 लाख वसूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - बनावट देयके सादर करून महाराष्‍ट्र दर्शन रजा योजनेची रक्कम लाटणा-या जिल्ह्यातील 19 शाळांतील 209 शिक्षक व कर्मचा-यांकडून 18 लाख 50 हजार रुपये शिक्षण विभागाने वसूल केले आहेत. त्यांच्यावर एक वेतनवाढ रोखण्याचीही कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिले आहेत. तसेच बोगस देयके मंजूर करणा-या अधिका-यांची विभागीय चौकशी होणार आहे.


महाराष्‍ट्र शासनाने कर्मचा-यांसाठी महाराष्‍ट्र दर्शन योजना सुरू केली आहे. दर्शन रजा घेऊन कुटुंबीयांसह चार दिवस सरकारी खर्चाने प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची मुभा असते. मात्र, काही वर्षांपासून या योजनेमध्ये अपहार होत आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील 209 शिक्षकांनी केलेला अपहार जिल्हा मागासवर्गीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने उजेडात आणला. तसेच कारवाईसाठी 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे जागे झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी करून दोषी शिक्षक, कर्मचा-यांकडून बिलापोटीची रक्कम वसूल केली आहे. जून महिन्याचे वेतन जमा झाल्यानंतर त्यातून 18 लाख 50 हजार रुपये वसूल केले.


असा झाला घोटाळा
जिल्ह्यातील 19 शाळांमधील 209 शिक्षकांनी या योजनेचा फायदा घेतला. त्यांनी बनावट देयके सादर केली. यामध्ये आदर्श नियमांचे पालन न करणे, तिकीट सादर न करणे, प्रवास केल्याची नेमकी तारीख नमूद नसणे, शाळा व्यवस्थापन समितीची मान्यता नसणे, समितीची मान्यता प्रवास केल्यानंतर घेणे, अपत्यांच्या जन्मतारखेचे पुरावे सादर न करणे, प्रवासास अगोदर मान्यता न घेणे, सुटीच्या कालावधीमध्ये प्रवास नसणे, हमीपत्र भरून न देणे अशा त्रुटी देयके सादर करताना दिसून आल्या.