आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आता वाहतुकीचे धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच वाहतूक नियमांची माहिती व्हावी, यासाठी जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या प्रयोगाची राज्य शासनाने दखल घेतली आहे. हा उपक्रम राज्यभरात राबवण्याचे पत्र परिवहन उपायुक्तांनी 10 ऑक्टोबर रोजी सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना पाठवले आहे. वाहतूक नियमांच्या या अभ्यासक्रमाचे वृत्त सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेऊन शालेय स्तरावर अभ्यासक्रम सुरू केला.

उस्मानाबाद येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे ज्ञान मिळावे, यासाठी सोप्या भाषेत वाहतुकीची नियमावली तयार केली होती. या नियमावलीची दखल सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने घेतल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या विषयाचा क्रमिक अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेला केल्या होत्या. या सूचनेवरून जिल्हा परिषदेने 2 मार्च 2012 रोजी शालेय स्तरावर अभ्यासक्रम सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले. सर्व शिक्षा विभागाच्या निधीतून 40 पानांच्या या पुस्तिकेची छपाई करण्यात आली. वाहतूक नियमांच्या अभ्यासक्रमाचा जिल्हा परिषद प्रशासनाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात आला. त्यानंतर 10 आणि 21 जानेवारी 2013 रोजी प्रशासनाच्या आदेशानुसार पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. पहिल्याच वर्षी सुमारे एक लाख 45 हजार विद्यार्थ्यांनी चाचणी दिली. 40 गुणांसाठी 20 प्रश्नांची ही चाचणी होती. 1300 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी, तर 90 टक्के विद्यार्थ्यांनी 40 पैकी 20 गुण मिळवले. प्रशासनाने केला आहे.


काय आहे अभ्यासक्रमात ?
सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी वाहतुकीच्या नियमांची माहिती सोप्या भाषेत देणारी 40 पानांची पुस्तिका तयार केली असून यामध्ये सामाजिक सुरक्षेचा भाग, रस्ता सुरक्षा अभियान, रस्त्यावरचा पहिला हक्क, फुटपाथ, मार्गिका, चालकांची कर्तव्ये, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक चिन्हे, सीटबेल्ट, स्पीड गव्हर्नर,पार्किंग, पर्यावरण, प्रदूषण, दोन सेकंदांचा नियम आदींची माहिती आहे. ही माहिती विद्यार्थ्यांना समजण्यासाठी सोपी आहे. असून अत्यंत उपयुक्त आहे.