आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतर्फी प्रेमातूनच पल्लवीचा बळी, छेडछाड करणाऱ्याला केली अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा - शाळेय विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी मुलीने कंटाळून आत्महत्या केल्याची घटना लिहाखेडी ता. सिल्लोड येथे शनिवारी (दि. २७)घडली होती. याप्रकरणी छेडछाड करणाऱ्या अनिल बावस्कर यास अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात हा एकतर्फी प्रेमातून घडलेला प्रकार असून यात आरोपीच्या तगाद्यामुळे पल्लवीला जीव गमवावा लागल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

लिहाखेडी येथील लक्ष्मी ऊर्फ पल्लवी भागवत साखळे (वय १६ रा. लिहाखेडी) असे एकतर्फी प्रेमाचा बळी गेलेल्या मुलीचे नाव आहे. ही अत्यंत हुशार व सामान्य स्वभावाची मुलगी शाळेतही हुशार होती. लिहाखेडी येथे सातवीपर्यंत शिक्षण झाल्याने तिने पुढच्या शिक्षणासाठी पालोद येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. ती शाळेत जात असताना आरोपी अनिल पंढरी बावस्कर हा तिची नेहमी छेड काढायचा. शुक्रवारी तर त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब पल्लवीला न पटल्यामुळे तसेच अनिलला सांगूनही सुधारत नसल्याने अखेर शुक्रवारी तिने विषारी औषध सेवन केले होते. त्या अवस्थेत तिने आपली चुलती कविताला ही हकीगत सांगितली. कविताने लगेच तिच्या वडिलाला कळवले ताेपर्यंत खूप उशीर झाला होता. तिला सिल्लोड रुग्णालयात उपचार करून औरंगाबाद येथे नेत असताना वाटेतच तिने प्राण त्यागले. तत्पूर्वी तिने सर्व हकीगत वडिलाला सांगितली होती.
सुरक्षेसाठी संपर्क नंबर
महिला सुरक्षा अॅप आहे. त्यातच ९८८१९३२२२२ व ७७६८९३२२२२ हा औरंगाबाद नियंत्रण कक्षाशी चोवीस तास जोडलेले व्हाॅट्स अॅप नंबर आहे. असुरक्षित महिला मुलींना काहीही अडचण असल्यास यावर संपर्क साधावा.