आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्याध्यापक अाणतात बैलगाडीतून पाेषण अाहार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर : शाळेला जाण्यासाठी चांगला रस्ता नाही, शासनाचा पोषण आहार घेऊन येणारा टेम्पाे तेथे पोहोचत नाही. अशा दुर्गम भागातील गाढवदरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार नियमित पुरवण्यासाठी तालुक्यातील शाळेचे मुख्याध्यापक दर दोन महिन्यांनी बैलगाडी वारी करतात.
दोन किलाेमीटर अंतरावर असणाऱ्या सोनीमोहा येथील शाळेतून तांदळाचे पोते त्यांना आणावे लागत आहे. शासनाची याेजना थेट लाभार्थींपर्यंत पाेहोचवण्यासाठी मुख्याध्यापक प्रयत्नशील असले तरी दुर्गम भागातील रस्त्यांकडे लाेकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे अधाेरेखित हाेते.

तालुक्यातील सोनीमाेहाअंतर्गत गाढवदरा वस्ती आहे. गावापासून दक्षिणेस चार किलाेमीटर अंतरावर तीस ते चाळीस घरांची ही वस्ती आहे. या वस्तीकडे जाण्यासाठी पाणंद रस्ता आहे. येथे बैलगाडी किंवा दुचाकीनेच जाता येते.
या वस्तीवर इयत्ता चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. येथे तीन वर्गखोल्या असून विद्यार्थी संख्या २१ आहे. या शाळेवर दयानंद क्षीरसागर हे मुख्याध्यापक असून काशीनाथ दराडे हे शिक्षक आहेत. दोनशिक्षकी शाळा आहे. येथे राहण्याची सोय नसल्याने शिक्षकांना दररोज चार किलाेमीटर पायपीट करावी लागते.
शाळेतील विद्यार्थ्यांना नियमित मध्यान्ह भोजन म्हणून तांदळाची खिचडी देण्यात येते. दर दोन महिन्यांनी शासनाच्या टेम्पाेतून पोषण आहार पुरवठा केला जाताे. परंतु बालाघाटाच्या डोंगरपट्ट्यातील अनेक वस्त्यांसाठी आजही चांगल्या रस्त्याची सोय नसल्याने तेथे शासनाचा टेम्पाे पोहोचत नाही. त्यामुळे अशा शाळांचा आहार बैलगाडीने शाळेत न्यावा लागतो.

इतर शाळांचीही अवस्था बिकट : तालुक्यातील हंगे वस्ती, भायजळीसह अनेक वस्त्यांवर पोषण आहाराचे वाहन पोहोचत नाही. त्यामुळे शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. हंंगे वस्तीवरील शिक्षकांना तर तांदूळ डोक्यावर आणावा लागतो.
बैलगाडीशिवाय पर्याय नाही
- गाढवदरा येथे पोषण आहाराचे वाहन येत नाही. पोषण आहार आणण्यासाठी वस्तीवरील शेतकऱ्यांची बैलगाडी विनंती करून घ्यावी लागते. दोन किलाेमीटर जावे लागते. बैलगाडीने पोषण आहार आणणे आता आम्हाला नेहमीचे झाले आहे. एक-एक बैल गोळा करून बैलगाडी जुंपावी लागते.
-दयानंद क्षीरसागर, मुख्याध्यापक, गाढवदरा वस्ती.
बातम्या आणखी आहेत...