आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूरात परीक्षेच्या दिवशीच शाळा कुलूपबंद, दोन शिक्षक निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - ऐन शिष्यवृत्ती परीक्षेच्या दिवशीच शाळा कुलूपबंद दिसल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी पंचनामा करून दोन शिक्षकांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश गटविकास अधिकार्‍यांना दिले आहेत. 23 मार्च रोजी उदगीर तालुक्यातील तोंडचीर येथे आयोजित कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे व बांधकाम सभापती कल्याण पाटील जात असताना त्यांना वाटेतील शेल्हाळ तांड्यावरील शाळा कुलूपबंद दिसली. त्यामुळे बनसोडे यांनी गट शिक्षणाधिकारी डॉ. शिवलिंग पटवे यांना तत्काळ बोलावून घेतले. त्यांनतर पंचनामा करून दोन शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश बीडीओंना दिले आहेत. शेल्हाळ तांड्यावर 1 ली ते 4 थीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून, तेथे मुख्याध्यापक एच.एल. भोसले व डी.व्ही. आंगडे हे दोन शिक्षक नियुक्त आहेत. या दोन्ही शिक्षकांवर आता निलंबनाची कुºहाड कोसळणार आहे.याच दिवशी चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा होती; परंतु शिक्षकांनी शाळा बंद ठेवून दांडी मारल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.