आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Second Time Assaulted, Special Task Force API Suspended

जालन्यात पोलिसांच्या चुकीने बलात्कार पीडितेवर आरोपींकडून दुसर्‍यांदा बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्‍थळाची पाहणी करताना विश्‍वास नांगरे - Divya Marathi
घटनास्‍थळाची पाहणी करताना विश्‍वास नांगरे
जालना - बलात्कार प्रकरणातील आरोपींनी पहिल्या सापळ्यात चकवा देऊनही पोलिसांनी त्यापासून धडा घेतला नाही. नियोजनाचा अभाव व विसंवादामुळे ती १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी दुसऱ्यांदा त्याच आरोपींच्या कचाट्यात सापडली. गुरुवारी रात्री ९ ते ९.३० वाजेदरम्यान रेवगाव रोडजवळील उड्डाणपुलाखाली आरोपींनी तिच्यासोबत दुष्कर्म केले. हा दुर्देवी प्रकार घडल्यानंतर संपूर्ण पोलिस यंत्रणा हादरली व तब्बल ४ तासानंतर मध्यरात्री १.३० व पहाटे ४ वाजता तालुका पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

सोमवारी रात्री ७ ते ९ वाजेदरम्यान नाव्हा शिवारात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात मंगळवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, तालुका पोलिस ठाणे, गुन्हे शाखा व विशेष कृती दलाने तपास सुरू केला. यात आरोपींनी मुलीचा मोबाईल हिसकावून नेला होता व त्याच मोबाईलवरून मुलीच्या आईच्या फोनवर वारंवार संपर्क केला. तसेच मोबाईल घेऊन जा, असे म्हणून त्या मुलीला पुन्हा बाहेर बोलावण्याचा प्रयत्न केला. ही माहिती पीडित युवती व तिच्या पालकांनी पोलिसांना दिली. याआधारे पोलिसांनी बुधवारी रात्री ७ ते १० वाजेदरम्यान शहरातील विविध मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे शोध घेतला. मात्र, यात पोलिसांना अपयश आले. तरीसुद्धा पोलिसांनी धीर सोडला नाही व तपास सुरूच ठेवला. गुरुवारी दुपारी पुन्हा आरोपींनी पीडितेशी संपर्क केला. त्यानंतर सायबर सेलच्या साह्याने पोलिसांनी आरोपीचे लोकेशन शोधले. खास खबऱ्यांमार्फत आरोपी पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र, त्या आरोपींना पकडण्यासाठीसुद्धा काही पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जणू स्पर्धा लागली.यातून झालेल्या विसंवादामुळे पीडित मुलगी पुन्हा आरोपींच्या तावडीत सापडली.
घटना कशी घडली हे वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा