आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Section 370 Then Drawn Swords, Know Why Governments On This Issue In The Quarrel

'घटनेतील 370 कलम रद्द केल्याने बहुचर्चित काश्मीर प्रश्न सुटणार नाही'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - 370 कलम रद्द केल्याने काश्मीर प्रश्न सुटण्याची शक्यता आहे, असे वाटत नाही. मात्र, राष्ट्रीय एकात्मता व धर्मनिरपेक्षता या तत्त्वांचा विचार करता 370 कलम रद्द केले पाहिजे, असे मत काश्मीर विषयाचे गाढे अभ्यासक व ‘काश्मीर : एक शापित नंदनवन’ या पुस्तकाचे लेखक शेषराव मोरे यांनी गुरुवारी व्यक्त केले. देशात सध्या 370 कलमावरून बरेच वादंग माजले आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’शी बोलताना मोरे म्हणाले, सार्वमत टाळण्यासाठी काश्मीरचे तत्कालीन पंतप्रधान शेख अब्दुल्ला यांच्याशी बोलून जवाहरलाल नेहरूंनी 370 कलमाचा तोडगा काढला. ही तात्पुरती तरतूद आहे, असे घटनेत नमूद आहे. या कलमानुसार काश्मीरसंबंधातील संरक्षण, दळणवळण व परराष्ट्र व्यवहार या तीन विषयांपुरताच भारताला अधिकार राहणार होता. उर्वरित सर्व हक्क त्या राज्याकडेच राहणार होते. हे कलम रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला; परंतु त्यासाठी काश्मीरच्या घटनासमितीची शिफारस आवश्यक होती. उघडपणे हे कलम जम्मू-काश्मीरची संपूर्ण जबाबदारी भारताकडे सोपवणारी पण काश्मीरसंबंधात भारताला कोणतेही हक्क नसणारे आहे. जम्मू-काश्मीर एखाद्या परकीय राष्ट्राप्रमाणे ठरत होते. त्यासाठीच हे कलम रद्द करण्याची मागणी सुरुवातीपासून होत आहे. काश्मीर हे मुस्लिमबहुल असल्याने हे कलम त्यांच्या समाधानासाठी देण्यात आले, अशीही भावना भारतात आहे.
कलम रद्द केले तरी प्रश्न सुटेल असे नाही : 370 कलम रद्द केल्याने काश्मीर प्रश्न सुटेल, असे समजण्याचे कारण नाही. हा प्रश्न कायद्याचा नाही, भावनेचा आहे. काश्मीर खोर्‍यातील 100 टक्के लोकसंख्या असलेल्या मुस्लिम जनतेचा हा प्रश्न आहे.