आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटककडे जाणाऱ्या टेम्पोतून साडेतीन लाखांचे मांस जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - बीडहून मांस घेऊन कर्नाटककडे जाणारा टेम्पो पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने  मंगळवारी रात्री शहरातील बार्शी नाका भागात पकडला. साडेतीन लाख रुपयांचे मांस जप्त करण्यात आले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत दोघांवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.  
 
टेम्पो कर्नाटककडे मांस घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यारून पोलिस अधीक्षकांच्या पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बार्शी नाका परिसरात केलेल्या तपासणीत एका टेम्पोत (एमएच १६ एई ९७८) ३२ बॅरल भरून मांस आढळून आले. पोलिसांनी ट्रक व चालक ताब्यात घेत ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले. गोमांस असल्याचा पोलिसांचा संशय अाल्याने मांसाचे नमुने मुंबई येथील कलिना प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. साडेतीन लाख रुपयांचे १९२० किलो मांस पोलिसांनी जप्त केले असून ट्रकसह एकूण ६ लाख ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

याप्रकरणी बुधवारी सायंकाळपर्यंत चालक अफजल जैनुद्दीन शेख (रा. पाली) व मालक दस्तगीर मेहबूब सय्यद (रा. तेलगाव नाका) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. निझामाबाद कनेक्शन, बीडमध्ये क्रॉसिंग : हे मांस निझामाबादहून कर्नाटकडे जात होते. मात्र सरळ गेल्यास पोलिस पकडतील यामुळे उलट्या मार्गे येत होते. 
 
बातम्या आणखी आहेत...