आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर जिल्हा बँक संचालक निवडणुकीत पाचव्या उमेदवाराचीही बिनविरोध निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत यापूर्वी चार जागा बिनविरोध निघाल्या होत्या. बुधवारी नाथसिंह देशमुख यांच्या विरोधातील दोघांनी आपले अर्ज माघारी घेतल्यामुळे पाचवी जागाही बिनविरोध निघाली. आणखी दोन जागा बिनविरोध काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी पाच मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घ्यावयाची अंतिम तारीख २४ एप्रिल आहे. बँकेच्या या निवडणुकीत यापूर्वी सोसायटी मतदारसंघातून आ. दिलीपराव देशमुख, विशेष मागास प्रवर्ग मतदार गटातून संभाजी सूळ, महिला मतदार गटातून शिवकन्या पिंपळे व रत्नप्रभा पाटील हे चार जण बिनविरोध निवडून आले आहेत. बुधवारी लातूर मतदारसंघातील शरद शिंदे व संभाजी वायाळ या दोघा उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतल्याने येथे नाथसिंह देशमुख (गातेगाव) यांचा एकमेव अर्ज राहिल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत.
दरम्यान, काँग्रेस पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा बँकेच्या अनुसूचित जाती मतदार गटातील तीन उमेदवारांपैकी सुनीता आरळीकर व राजकुमार भोसले यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तेथून पृथ्वीराज शिरसाट बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. तसेच मत्स्य उत्पादक मतदार गटातून एक उमेदवार माघार घेत असल्याने या ठिकाणाहून विद्यमान अध्यक्ष एस. आर. देशमुख बिनविरोध निवडून येणार, अशी चर्चा आहे, पण त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
बातम्या आणखी आहेत...